कोरची तालुक्यातील विविध प्रलंबित समस्या तात्काळ सोडवा, अन्यथा बेमुद्दत आंदोलनाचा इशारा...

 

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

  • कोरची येथील सरपंच संघटनेची जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी..

कोरची तालुका हा गडचिरोली जिल्हयाच्या उत्तर टोकावर असून अतिसंवेदनशिल तालुका म्हणून ओळखला जातो. तसेच विविध समस्यांनी ग्रासलेला एक आदिवासी बहुल तालुका आहे. कोरची तालुक्यातील विकास कामांची गती अतीशय संथ असुन अजुन पर्यंत येथील अतिदुर्गम भागातील गावे विकासापासून कोसो दूर आहेत. कोरची तालुक्यात विविध प्रलंबीत समस्या आहेत या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरपंच संघटना कोरचीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याकडे निवेदन देण्यात आले व यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा ईशारा सुद्धा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला.

  •  पं.स. कार्यालय कोरची येथे रिक्त असलेले गट विकास अधिकारी यांचे पद तात्काळ भरण्यात यावे. 
  •  ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या स्ट्रीट लाईट चे बिल शासन स्तरावरून भरण्यात यावे. 
  •  ग्रामपंचायत मध्ये लावण्यात आलेले नेटवर्क कनेक्शन तात्काळ सुरु करण्यात यावे.
  •  ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले सर्व शासकीय कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याबाबत आदेशित करण्यात यावे व ग्रामपंचायत मुख्यालयी राहण्याबाबतचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मासिक वेतन अदा करण्यात येवू नये.
  •  शबरी/ रमाई /प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत येणारा निधी तात्काळ पं.स. स्तरावर वर्ग करण्यात यावे.
  •  रोजगार हमी योजना अंतर्गत होणारे कामांचे निधी तात्काळ पं. समिति वर्ग करण्यात यावे.
  •  सरपंच आणि ग्रामसेवक यांची संयुक्त सभा गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पं.स. स्तरावर आयोजित करण्याबाबत आदेशित करण्यात यावे.
  •  कोरची तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शासकिय निवासी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी व त्यांना मुख्यालयी राहण्याबाबत सक्ती करण्यात यावी. 
  •  पं.स. कार्यालय कोरची अंतर्गत येणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याबाबत सक्ती करण्यात यावी.
  •  नरेगा मधुन होत असलेल्या सार्वजनिक विहीर व वैयक्तिक सिंचन विहीर व इतर कामांचे निधी तात्काळ पं.स. स्तरावर वर्ग करण्यात यावे. 
  •  शासनाच्या महा डिबीटी पोर्टल अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीरीचा निधी तात्काळ पं.स. स्तरावर वर्ग करण्यात यावे.
  •  एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत कोरची येथे रिक्त असलेले पद तात्काळ भरण्यात यावे.
  •  पं.स. कार्यालय कोरची येथे नरेगा या विभागामध्ये नविन TPO ची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी.
  •  कोरची तालुक्यातील मसेली परिक्षेत्रातील मसेली ते चरविदंड व मसेली ते मयालघाट रस्त्यांचे खडीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. तरी ताबडतोब डांबरीकरण करण्यात यावे.
  •  कोरची तालुक्यातील कोटगुल परिक्षेत्र अंतर्गत विद्युत पुरवठयाची समस्या तात्काळ सोडविण्यात यावी.
  •  कोरची तालुक्यातील कोरची ते बोटेकसा या मार्गाची दयनिय अवस्था झालेली आहे. तरी सदर रस्त्यांचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात यावे. 

त्याचबरोबर मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याचे सक्तीचे आदेश देण्यात यावे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.                यावेळी कोरची तालुक्यातील सरपंच संघटनेचे सचिव दिलीप केरामी, मसेली ग्रा. पं सरपंच सुनिल सयाम, उपसरपंच विरेंद्र जांभुळकर, अलिटोला सरपंच गणेश गावडे, बिहीटेकला सरपंच किशोर नरोटे, नवेझरी उपसरपंच वासुदेव पंधरे, आस्वलहुडकी सरपंच छायाताई बोगा, कोहका सरपंच रविता हलामी, कोहका उपसरपंच ममता सहारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.