'

चंद्रपूर: ब्रम्हपुरी शहरात चाकू हल्ला ,हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी | Batmi Express

0

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Live,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,

ब्रम्हपुरी 
: तालुक्यातील वातावरण गढूळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील तीन दिवसांत चाकू हल्ला व मारहाणीच्या दोन घटना घडल्या आहेत. सोमवारी रात्री जेवण करताना किरकोळ वादातून एकाने चाकूने वार केल्याची घटना घडली. तर गुरुवारी बेलपातळी येथे दोन गटांत चाकूने व लोखंडी दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली.

यात मनोहर भरे (वय ५४ ) व योगीराज कुथे (वय ५०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे समजते. अवैध व्यवसायाने कमी वेळात जास्त पैसा कमावण्याच्या नादात अनेक गुन्हे घडत असल्याचे प्रकार निदर्शनात येत आहेत. यातून किरकोळ वाद, सामूहिक वाद, भांडण तंटे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत पोहोचले असल्याचे दिसून येते. येथील एकाबारमध्ये दारू पिल्यानंतर जेवण करताना किरकोळ वादातून एकाने दुसऱ्यावर चाकूने वार केला. यात नशीब बलवत्तर म्हणून गळा कापला गेला नाही. अन्यथा तिथे खून झाला असता. हे प्रकरण शांत होत नाही तोच, तीन दिवसांनी गुरुवारी बेलपातळी येथे दोन गटांत मारहाणीची घटना घडली. यात योगीराज कुथे यांच्या डोक्यावर लोखंडी दांड्याने, तर मनोहर भरे यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आला. एकमेकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, कलम ३०७, ५०४, ३२४, ३४ अन्वये दोन्ही बाजूंच्या आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही जखमी रुग्णालयात उपचार घेत असून, पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×