डांबरीकरणाचे पक्के रस्ते व अन्य समस्यांचे निराकरण करा, मोठाझेलिया ग्रामसभांचा जिल्हाधिकारीला निवेदन | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची
: ग्रामपंचायत मोठाझेलिया अंतर्गत बोटेझरी, नारकसा, तलवारगड, टेकामेटा या गावांना अजूनही दळणवळण करण्याकरिता रस्ते नाही. अतिसंवेदनशील दुर्गम भागातील ही गावे असून या गावांमध्ये आदिवासी समुदाय लोकांची संख्या जास्त आहे. देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष होऊन सुद्धा सदर गावांपर्यंत पक्के रस्ते पोहोचली नाहीत त्यामुळे शासनाची योजना गावापर्यंत व लोकांपर्यंत वेळेवर मिळू शकत नाही. मुख्य रस्त्यांना जर सदर गावाचे रस्ते पक्के रस्त्याने जोडल्यास गावातील व लोकांच्या समस्यांचे निराकरण होईल.

गावांना रस्त्याचे काम मंजूर झाल्यास वरील चारही गावातील सर्व लोकांची रस्ते निर्माण करण्यात सहकार्य राहिल. तसेच यापूर्वी  ग्रामपंचायत मोठाझेलिया अंतर्गत बोटेझरी, नारकसा, तलवारगढ, टेकामेटा या गावांकरिता नवीन पक्के रस्ते मंजूर करण्यात यावे यासाठी ७ जानेवारी व २५ जुलै २०२२ ला निवेदन देण्यात आले आहे परंतु याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शासनाने विकासाच्या दृष्टिकोनातून या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भीमनखोजी ते बोटेझरी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, बोटेझरी, नारकसा, टेकामेटा या गावातील वीजपुरवठा तीस वर्षापासून खंडित असून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावे, मुख्य रस्ता ते टेकामेटा दोन किलोमीटर पक्का रस्ता बनवून डांबरीकरण करण्यात यावे, न्याहाकल ते तलवारगड चार किलोमीटर पक्का डांबरीकरण रस्ता करण्यात यावे, टिपागड देवस्थान येथील न्याहाकल येथे यात्रींना थांबवण्यासाठी विश्रामगृह मंजूर करण्यात यावा अशी मांगणी निवेदनातून जिल्हाधिकारी संजय मीना यांना मोठाझेलिया सरपंच गांगसाय मडावी, बोटेझरी ग्रामसभा अध्यक्ष अनिराम बागा, सचिव दयाराम पुळो व चारही गावातील ग्रामसभांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.