'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर: सात दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीला बापाने भर रस्त्यावर फेकून काढला पळ | Batmi Express

0

Chandrapur,Gondpipari,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur Crime,

चंद्रपूर
: सात दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीला पाहण्यासाठी आलेल्या बापाने आपल्या मुलीला भर रस्त्यावर फेकून पळ काढला. ही घटना शनिवार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे घडली. यानंतर गावकऱ्यांनी या निर्दयी बापाला पकडून ग्रामपंचायतीत आणले. नवजात बाळाची प्रकृती चिंताजनक असून, रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे आज घडली. घटनेची माहीती पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी वडीलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. 

एक वर्षापूर्वी शिरशी बेर्डी येथील कुमोद पौटकर (34) याचा विठ्ठलवाडा येथील भाग्यश्री देवतळे हिच्याशी विवाह झाला. दरम्यान, नुकताच सात दिवसापूर्वी भाग्यश्रीने गोंडस मुलीला जन्म दिला. रुग्णालयातून सुट्टी होऊन ती विठ्ठलवाडा येथे माहेरी परतली. यानंतर शनिवारी मुलीला पाहण्यासाठी म्हणून वडील कुमोद पौरकार आला व त्याने सासरकडील मंडळीसोबत वाद घातला. त्यानंतर नवजात मुलीला घेऊन धूम ठोकली. बाळाला नेऊ नका म्हणून भायश्रीसह तिचे कुटुंबिय त्यांच्यामागे निघाले. तोपर्यंत कुमोद मुलीला घेऊन गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेपर्यंत निघून गेला. दरम्यान आरडाओरड करताच बाळाला भर रस्त्यात फेकून त्याने धूम ठोकली. यावेळी समोरुन घेणाऱ्या गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि गावच्या ग्रामपंचायतीत डांबले. भर रस्त्यात नवजात बाळाला जोरात फेकल्याने बाळाची हालचाल बंद झाली. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी कुमोद पौरकार यास ताब्यात घेतले. पुढील तपास गोंडपिपरी पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×