तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी | Batmi Express

Mul,Mul News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Tiger Attack,Chandrapur Live,Chandrapur Today,Tiger Attack,
Mul,Mul News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Tiger Attack,Chandrapur Live,Chandrapur Today,Tiger Attack,

मूल : दिवसेंदिवस वाघाचे मानवावर हल्ले वाढत असतानाच रविवारी जनावरे घेवुन चराईसाठी नेलेल्या एका गुराख्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करुन जखमी केल्याची घटना आगडी येथे घडली. अरविंद आबाजी गेडाम वय 42 वर्षे रा. आगडी असे वाघाच्या हल्लात जखमी झालेल्या गुराख्याचे नांव आहे.

भारतामधुन गेल्या अनेक वर्षापासुन चित्ता हे प्राणी लुप्त पावलेले आहे, त्याचे परत पुर्नवसन करण्यासाठी शासन पुढाकार घेऊन मध्यप्रदेशातील एका प्राणी संग्रालयात सोडण्यात आलेले आहे. वन्यप्राणी वाचले पाहिजे यासाठी शासन, अधिकारी बारकाईने लक्ष देत असतानाच वन्यप्राण्याकडुन मानवावर होत असलेले हल्ला थांबावे यासाठी त्यांच्याकडुन पाहिजे त्याप्रमाणात लक्ष दिल्या जात नसल्याने दिवसेदिवस वाघाचे हल्ला वाढत आहे, मूल तालुक्यातील आगडी येथील अरविंद आबाजी गेडाम हे रविवारी बैल चराईसाठी जंगलात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने दुपारी 1.30 वाजता हल्ला करुन जखमी केले. त्याच्यासोबत असलेल्या इतर गुराख्यानी आरडाओरड केल्याने वाघ निघुन गेल्याने इतर गुराख्यानी ही माहिती गावकऱ्याना दिले, दरम्यान वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या अरविंद गेडाम यांना मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठुन पंचनामा करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.