'
30 seconds remaining
Skip Ad >

अल्पवयीन मुलीला प्रपोज करणे पडले भारी, मजनूवर गुन्हा दाखल | BatmiExpress™

0

Gondia,Gondia Crime,Gondia Live,gondia news,
Photo use news purpuse

गोंदिया
:  एकतर्फी प्रेम प्रकरणातुन अल्पवयीन मुलीला बळजबरीने गाडीवर बसवून प्रपोज करणाऱ्या मजनूवर शहर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.  सदर घटना सोमवारी (दि. २९) घडली आहे.  

शहरातील गांधी वॉर्डमधील आरोपी अमोल राजकुमार जैयसवारा (२७) याने शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सुभाष गार्डनच्या गेट समोरून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या मोटार सायकलवर बळजबरीने बसवून मुर्री तलावाकडे नेले. मुर्री तलावाकडे नेउन आपली मोटारसायकल थांबवून त्या मुलीला मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्याशी बोलत का नाही, असे बोलून तिचा विनयभंग केला. या घटनेसंदर्भात त्या मुलीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३५४, ३५४ (ड) सहकलम ८, १२ बाललैंगिक अत्याचार अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×