तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Student Suicide: नीट परीक्षेच्या अपयशाने विद्यार्थ्याची विष प्राशन करून आत्महत्या | BatmiExpress™

Etapalli,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Suicide,Gadchiroli Batmya,Gadchiroli Live News,Suicide,Suicide News,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Etapalli,Gadchiroli,suicide news,suicide,Gadchiroli Suicide,Gadchiroli Batmya,

एटापल्ली : 
एटापल्ली जवळील पद्देवाही (टोला) येथील हर्षद सदु तलांडे (१८) याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. हर्षद हा गुरुपल्लीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य रुनिता तलांडे व बिड्री जिल्हा परीषद शाळेतील शिक्षक संदु तलांडे यांचा मुलगा आहे. त्याने यापूर्वी  नागपूरला जाऊन नीट परीक्षा दिली होती, पण परीक्षेत कमी गुण मिळाले. ( Student Suicide )

मागील महिन्यात त्याने पुन्हा नीटची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल लागायचा आहे. परीक्षा दिल्यानंतर १९ ऑगस्टला तो घरी परत आला होता पण नीट परीक्षेत अपेक्षित यश मिळेल की नाही या तणावात तो रहात होता. अशातच मंगळवारला पहाटे ५.३० च्या सुमारात त्याने घरी विष प्राशन केले. त्याला ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे भरती करण्यात आले. येथून अहेरी येथे रेफर करण्यात आले. अहेरीवरुन चंद्रपूरला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र बुधवारी पहाटे २.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. शिक्षक संदु तलांडे यांना एक मोठी मुलगी असून हर्षद हा एकुलता एक मुलगा होता.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.