वणी :- वणी – वरोरा मार्गावरील वर्धा नदीच्या पुलाच्या लोखंडी कठड्याला युवक गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ माजली. आज ३१ ऑगष्टला पहाटे काही वाहन चालकांना हा युवक ट्यूबने (टायर) वर्धा नदीच्या पुलाभोवती असलेल्या कठड्याच्या लोखंडी पाईपला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. वर्धा नदीच्या पुलावरील लोखंडी कठड्याला ट्यूबने लटकलेल्या अवस्थेत युवकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला.गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवक वणी शहरातील डॉ. आंबेडकर चौक परिसरातील रहिवासी असून तेजस मोगरे असे त्याचे नाव असून मृतकाचे वडील पोलीस खात्यात कार्यरत आहेत तसेच मृतक व्हॉलीबॉल खेळाडू असल्याची माहिती आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. वर्धा नदीच्या पुलावर एक दुचाकी आढळली असून ती या युवकाचीच असावी असा तर्क लावल्या जात आहे. दुचाकींचा क्रमांक MH 34 BL 5163 असा आहे. आत्महत्या की इतर काय हे पोलीस तपासात निष्पन्न होईल.
पोलीस घटनास्थळी पोहचून मृतदेह शवविच्छेदना करिता पाठवण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.