आरमोरी: वाघाच्या हल्यात महिला ठार, 24 तासात दुसरी घटना | BatmiExpress™

Armori Tiger Attack,Bramhapuri,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Armori Live,Tiger Attack,Gadchiroli Batmya,Armori,Armori News,

Armori Tiger Attack,Bramhapuri,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Armori Live,Tiger Attack,Gadchiroli Batmya,Armori,Armori News,

गडचिरोली:- आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा जवळील शंकरनगर नाल्यालगत जंगलात वाघाने इसमाचा बळी घेतल्याच्या घटनेस 24 तासाचा कालावधी पुर्ण न होता आज 30 ऑगस्ट रोजी वाघ पोरला वनपरीक्षेत्रात येणाऱ्या चुरचुरा खंड क्रमांक 3 मध्ये वाघाने महिलेला ठार ( Women Killed Tiger Attack ) केल्याची खळबजनक घटना घडली आहे. सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास ठार केल्याची घटना घडली असुन वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव पार्वताबाई नारायण चौधरी (Parvatabai Narayan Chaudhary ) (वय 55 वर्ष) रा. चुरचुरा येथिल रहिवासी आहे. 

प्राप्त माहितीनुसार पार्वताबाई ही पती नारायण चौधरी यांच्यासमवेत मुजामती मंदीर परीसरात बैल चारण्यासाठी गेले होते. दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने पार्वताबाई चौधरी हिच्यावर हल्ला करून तिला ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी आर. बी. मडावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून पार्वताबाई यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली. पोली वनपरिक्षेत्रात वाघाने आतापर्यंत 9 जणांचा बळी घेतला असुन यावर्षीचा तिसरा बळी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.