गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात बैठक संपन्न | BatmiExpress™

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News Live,Chandrapur Today,

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News Live,Chandrapur Today,

चंद्रपूर : 
आज 30 आगस्ट 2022 रोजी माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांची आगामी येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये पोलीस पाटील यांनी त्यांच्या गावातील शांतता भंग होणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणार या दृष्टीने मंदिर, मज्जीद, गुरुद्वारा, बोद्ध-विहार, पुतळे व सर्व धार्मिक स्थळे याकडे विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत जातीने लक्ष देणे. कोणताही अनुचित प्रकारनिदर्शनास आल्यास तात्काळ प्रभारी ठाणेदार यांना कळविणे. गाव पातळीवर अंधश्रद्धा, नरबळी, जादूटोणा असे प्रकार आढळून आल्यास त्याची माहिती लगेच प्रभारी ठाणेदार यांना देणे. विसर्जन वेळेस आपण हजर राहून पोलीस विभागास सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.