'
30 seconds remaining
Skip Ad >

कोरची: प्रदेशाध्यक्षांना कोरची तालुक्यातील समस्या सोडवण्यासंदर्भात पाठपुराव्याबाबत महिला तालुका अध्यक्षांचे निवेदन... | BatmiExpress™

0

Korchi,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli live,

कोरची
:- कोरची तालुका हा आदिवासी, नक्षलग्रस्त अतिसवेंदनशील असुन या तालुक्यात कोणत्याही प्रकारचे मोठे उद्योग-धंदे नाहीत. येथे बहुसंख्येने शेतकरी वास्तव्य करतात आणि हा तालुका अनेक वर्षापासून विविध समस्यानी ग्रस्त आहे. ३० ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब गडचिरोली दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन कोरची तालुक्यातील समस्यांकडे प्रदेशाध्यक्षांनी प्रामुख्याने लक्ष द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे कोरची तालुकाध्यक्षा गिरजाताई कोरेटी तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष प्रेम उसेंडी यांनी मा. जयंत पाटील साहेब, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तथा सदस्य विधीमंडळ मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. 

कोरची तालुक्यातील विद्युत समस्या कायमस्वरूपी सोडवणे. कोरची तालुक्यातील-कोटगुल (ढोललडोंगरी) येथे 33 के.व्ही. विद्युत उपकेंद्राचे काम त्वरित सुरु करणे. कोरची तालुक्यात विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरणे. तालुक्यातील शेतकरी कृषी पंप व विद्युत मिटर साठी मागणी केलेल्या शेतकऱ्यांचे विद्युत मिटर त्वरित जोडणे. तालुक्यातील कोटगुल येथे राष्ट्रीयकृत बँकेचे शाखा देण्यात यावे. तालुक्यातील बिमानखुजी-नारकसा-बोटेझरी रस्ता व पुलाचे बांधकाम करण्यात यावे. तालुक्यातील टेकामेटा गावात जाण्यासाठी रस्ता व पुल बांधण्यात यावे. तालुक्यातील गोटाटोला ते कोटगुल फाटा पर्यंत डांबरीकरण रस्ता मंजूर करुन काम करण्यात यावा. कोरची ते बोटेकसा रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरू करणे. कोरची-नागपूर बस फेरी सुरू करणे. कोटगुल-गडचिरोली बस फेरी सुरु करणे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण व पाड्यात इंटरनेट ची 4G सेवा देण्यात यावे. तालुक्यातील कोटगुल वरुन छत्तीसगढ ला जाणारा मार्गात वाको गावालगतच्या पुढच्या नाल्यावर मोठा पुल बांधण्यात यावा. तालुक्यातील शिवनाथ नदीवर जल सिंचन प्रकल्प (एरीगेशन) मंजूर करून बांधण्यात यावे. तालुक्यातील दुग्गाटोला(कोटगुल) येथे मोठे धरण निर्माण करावे. तालुक्यातील कोटगुल ते वाको प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निकृष्ठ दर्ज्याच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून कंत्राटदारावर तात्काळ कार्यवाही करावे.

      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोरचीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×