सप्टेंबर १६, २०२२
0
कोरची : कोरची तालुका आदिवासी बहुल, नक्सलग्रस्त तालुका असून या तालुक्यातील नागरिकांना अजूनही बहुतेक सोयी सुविधेपासुन वंचित राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
खालील समस्यांचे निवारण व्हावे ही विनंती निवेदनातून जिल्हाधिकारी यांना करण्यात आले. निवेदनात कोरची भीमपुर मार्ग हा राज्य मार्ग असून छत्तीसगढ़ राज्याला जोडला गेलेला आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असून या मार्गावर कित्येक अपघात व वाहनाच्या डिजेल व पेट्रोल टँक फुटल्याने अपघात होत आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोरची गाठणे अवघड झाले आहे. या मार्गाने रुग्नवाहिका पण जाऊ शकत नसल्याने रुग्णाना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंच व्हावा याकरिता प्रशासन वेगवेगळी उपाय योजना राबवित आहे परन्तु कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील वर्ग 1 ते 7 पर्यंतची पटसंख्या 132 असून त्यांना बसन्याकरीता फक्त 2 वर्ग खोली व 3 शिक्षक आहेत. ज्यामुळे त्यांना शिक्षण घेणे अवघड जात आहे.
कोरची तालुक्यातील बहुतेक शाळेतील इमारत ही जर्जर अवस्थेत असून यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील 3 ते 4 वर्षापासून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना अजुन पर्यंत विज जोडनी करून देण्यात आलेली नाही. मुख्य म्हणजे तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठलाही प्रकारचा जोड़धन्दा नाही. कोरची येथील राजीव भवन हा एकमात्र सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्याकरिता इमारत असून,सध्या ती इमारत शेवटच्या घटका मोजत असून त्यांचा वाली कोण? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
वरील समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने समस्येचे निराकरण करावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कोरची येथे दिनांक 15/09/2022 ला ग्रामसभा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा उपस्थित होते. यावेळी कोरची येथील मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुरज हेमके ,जितेंद्र सहारे ,राष्ट्रपाल नखाते यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
सदर बाबींची चौकशी करून संपूर्ण समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिले.
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.