तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गणपती विसर्जन स्थळांची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केली पाहणी

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,

चंद्रपूर
: गणपतीचे विसर्जन दोन दिवसांवर आले आहे. या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शहरातील विसर्जन स्थळाची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, तहसीलदार नीलेश गौंड, मनपा उपायुक्त अशोक गराटे, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील आदी उपस्थित होते.

शहरातून निघणा-या मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी करून जिल्हाधिका-यांनी दाताळा रोड येथील इरई नदी काठावरील विसर्जन स्थळाची पाहणी केली. मुर्तीचे विसर्जन करतांना एकाच वेळी गर्दी होऊ देऊ नका, त्यासाठी योग्य नियोजन करावे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. नागरिकांनी घरगुती छोट्या गणपतीचे विसर्जन मनपातर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात करावे. इरई नदीच्या पाण्याचा प्रवाह असल्यामुळे कुणीही नदीच्या पात्रात उतरू नये. सणांचे महत्व कायम राखून भाविकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तत्पूर्वी जिल्हाधिका-यांनी जेटपुरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक येथे वाहतूक व्यवस्था कशी राहील, याची माहिती जाणून घेतली.


Chandrapur: Ganpati's immersion is two days away. On this background, Collector Ajay Gulhane inspected the disposal site in the city and reviewed the system. Additional Collector Vidyut Varkhedkar, Tehsildar Nilesh Gound, Municipal Deputy Commissioner Ashok Garate, Traffic Police Inspector Praveen Kumar Patil etc were present on this occasion.

After inspecting the procession route from the city, the District Collector inspected the immersion site on the bank of Irai River at Datala Road. Do not allow crowding at the same time while immersing the idol, proper planning should be done for it. Make sure that the traffic system remains smooth. Citizens should immerse the small homemade Ganesha in the artificial pond created by the Municipal Corporation. As the water of the river Irai flows, no one should enter the river bed. He appealed to the devotees to cooperate with the district administration by maintaining the importance of festivals.

Earlier, the District Collector learned the information about how the traffic system will be at Jetpura Gate, Girnar Chowk, Gandhi Chowk.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.