कुरखेडा येथील चेताली गावंडे हिचा आकस्मिक मृत्यु | Batmi Express

kurkheda,Kurkheda News,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli live,

kurkheda,Kurkheda News,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli live,

कुरखेडा, ८ सप्टेंबर
: येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते, भाजपा ओबीसी आघाडीचे विदर्भ महामंत्री विलास गावंडे यांची लहान मूलगी चेताली विलास गावंडे (२२) हिचा घरीच बुधवार ७ सप्टेंबर रोजी आकस्मिक मृत्यु झाला.

मृत्यु समयी ती घरी एकटीच होती. आई -वडील, भाऊ यावेळी काही कामानिमीत्य बाहेर होते. आई घरी पोहचल्यावर ती बेशुध्द अवस्थेत असल्याचे दिसून आल्याने तिला लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिची तपासणी करीत मृत घोषित केले.
मागील काही दिवसापासून ती आजारी होती व तिच्यावर औषधोपचार सुरू होते अशी माहिती आहे. मात्र काल अचानक तिचे निधन झाल्याने कूटूंबासह शहरवासीयांना मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ती येथील गोविदराव मुनघाटे महाविद्यालयात बि.एस.सी अंतीम वर्षाची विद्यार्थीनी होती. तिच्या पश्चात आई- वडील, भाऊ, बहिण व मोठा आप्तपरीवार आहे

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.