'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर | रेल्वेची धडक... अन... वाघाचे झाले तुकडे! | BatmiExpress™

0

Rajura,Rajura News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

राजूरा (चंद्रपूर) :
रेल्वेने धडक दिल्याने वाघाचे दोन तुकडे पडल्याची घटना जिल्ह्यातील राजूरा तालुक्यात घडली. बल्हारपूर ते काझीपेठ या दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गातील चनाखा ते विहिरगाव दरम्यान ही घटना आज घडली. या मार्गावर अनेकदा रेल्वेचा धडकेत वन्यजीवांचा मृत्यू झालेला आहे.

रेल्वे विभागाचा गँगमन नेहमीप्रमाणे रेल्वे ट्रक तपासणी करीत जात होता. चनाखा ते विहिरगाव मार्गावरील दृश्य बघून तो हादरला. कक्ष क्रमांक 160 मधील रेल्वे रुळालगत वाघ ठार झाल्याचे त्याला दिसून आले. लगेच त्यांने रेल्वे स्टेशन प्रमुखाना घटनेची माहिती दिली. घटनेची माहीती मिळताच राजुरा वनविभागातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पंचनामा केला आणि वरिष्ठ वन अधिकार्याना घटनेची माहिती दिली. या रेल्वे मार्गात आतापर्यंत वाघ, अस्वल, चितळ या १ वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. सतत घडणाऱ्या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×