कोरची : (तालुका प्रतिनिधी- चेतन कराडे)- स्थानिक कोरची येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयात रासेयो विभागाद्वारे माजी पंतप्रधान दिवंगत ,,भारतरत्न राजीव गांधी यांच्या ७८व्या जंयती निमित्त दिनांक २० ऑगस्टला महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. विनोद चहारे यांच्या अध्यक्षतेखाली सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. प्रदीप चापले यांनी केले व प्रास्ताविक प्रा. संजय दोनाडकर व प्रा. डॉ. मुरलीधर रुखमोडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. आर. एस. रोटके, प्रा. गजाधर देशमुख प्रा. किशोर वालदे व प्रा. विनायक सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी सर्व भारतीयांमध्ये शांतता, राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक सद्भावना वाढविण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले व नंतर सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेण्यात आली. शेवटी प्रा. जितेंद्र विनायक यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला रासेयो स्वयंसेवक व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.