सिंदेवाही - सर्वत्र गोकूळ अष्टमी मोठया उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सिंदेवाही येथील कल्पतरू विद्यामंदिर येथील गोकुळ जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या गोकूळ अष्टमीच्या निमीत्याने विदयार्थ्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शालेय विदयार्थ्यांनी विवीध उपक्रमाअंतर्गत हंडी फोड स्पधैत विदयार्थ्यांनी भाग गोंविंदा रे गोपाळा या गजरात दही हांडी फोडून उत्सवात भाग घेतला. तसेच आजच्या मोबाईल च्या युगात मुल भजन सुध्दा सादर करीत भजन गायनात हिरहिरीने भाग घेवून भक्तीभावाने भजन गायले. हे कार्यक्रमांचे वैशिष्टय होते.
गोपाळकाला आणि दहीहंडी फोडून संपूर्ण कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी कल्पतरूच्या शिक्षकासह समस्त घटकांनी परिश्रम घेतले.