पोंभूर्णा:- वेळवा मार्गावर असलेल्या शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या एका महिलेला चाकूचा धाक दाखवून तीन अज्ञात व्यक्तींनी सोन्याचा मंगळसूत्र लुटण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेनी सज्ञान बाळगत आरडाओरड केल्याने काही लोक घटनास्थळी पोहचल्याने चोरटे तिथून पळून गेले व अनुचित घटना टळली.
पोंभूर्णा शहरापासून नजीक असलेल्या वेळवा मार्गावरील बालाजी टाऊन परिसरात असलेल्या आपल्या शेतात सकाळी आठ वाजताच्या सुमारास गवत कापण्यासाठी गेलेल्या गयाबाई तुळशिराम गुरूनुले वय ६५ वर्ष हि सकाळी आठ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात गवत कापण्यासाठी गेली होती. तीन अज्ञात व्यक्ती गयाबाई जवळ जाऊन तीला चाकूचा धाक दाखवून मंगळसुत्र लुटण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने सज्ञान बाळगत तीने आरडाओरड केला.रस्त्याने जाणारे काही लोक तिच्या दिशेने येत असल्याचे पाहून अज्ञात चोर तिथून पळून गेले.सदर घटनेच्या तोंडी रिपोर्टवरून अपराध क्रमांक ७३/२२ कलम ३९३,३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संतोष येनगंदेवार करीत आहेत.