'
30 seconds remaining
Skip Ad >

Chandrapur Flood 2022 | ढगफुटी पावसामुळे चंद्रपूर शहर पुन्हा जलमय | BatmiExpress™

0

चंद्रपूर - 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर चंद्रपुरात पुन्हा एकदा पावसाने दमदार ( Chandrapur Heavy rainfall ) हजेरी लावल्याने शहरातील अनेक भागात पुरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. 9 आणि 10 ऑगस्टला हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट आणि अतिवृष्टीचा इशारा देत, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. ढगफुटी पावसामुळे शहरातील रहमतनगर व सिस्टर कॉलनी भागात पुन्हा नदीचे पाणी शिरले, अनेक घरे पाण्याखाली आल्याने ( Chandrapur Flood situation ) नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रशासनाने पुराची समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रशासन किती दिवस मदत करणार, एकदा समस्येचा तोडगा काढा, नदीकाठी असणारे अवैध अतिक्रमण प्रशासनाने काढावे अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. ( Chandrapur Flood 2022 )  

चंद्रपूर वरून चोराला जाणारा मार्ग पावसाने पूर्णपणे बंद झाला आहे. रहमतनगर व सिस्टर कॉलोनी भागात तिसऱ्यांदा ही पुरपरिस्थिती उदभवली आहे. 

पाऊस आला की पाण्याची पातळी वाढते आणि अचानक आम्हाला दिवसा किंवा रात्री दुसरीकडे आश्रय घ्यावा लागत आहे अशी खंत नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar)  यांच्या दौऱ्यात त्यांनी अतिक्रमण काढण्याचे प्रशासनाला निर्देश दिले होते, मात्र त्यांच्या निर्देशावर कसलीही कारवाई न झाल्याने नदी व नाल्याचे पाणी पुन्हा एकदा शहरात शिरले. ( Chandrapur Flood 2022 ) 


Chandrapur - After a break of 15 days, heavy rains have once again made an appearance in Chandrapur, causing torrential conditions in many parts of the city. On August 9 and 10, the Meteorological Department issued a red alert for Chandrapur district and warned of heavy rain, urging residents living along the river to be alert. Due to continuous heavy rains, river water again entered Rahmat Nagar and Sister Colony areas of the city, many houses were flooded, causing great distress to the citizens. Citizens have demanded that the administration solve the flood problem permanently.

The citizens have demanded that for how long the administration will help, solve the problem once and for all, the illegal encroachments along the river should be removed by the administration.

The road from Chandrapur to Chorala has been completely closed due to rain. This is the third time this situation has arisen in Rahmatnagar and Sister Colony areas.

The citizens expressed their regret that the water level rises when it rains and suddenly we have to take shelter elsewhere during the day or night.

During the visit of opposition leader Ajit Pawar, he had instructed the administration to remove the encroachments, but as no action was taken on his instructions, river and canal water once again entered the city.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×