- Live Now - Date : 20-07-2022
Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन बुधवारला प्रकल्पाचे सर्व 25 दरवाजे 0.5 मीटरने उघडण्यात आले असून, 2632.75 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलं आहे - अशी माहिती बातमी एक्सपेसला देण्यात आली आहे.
तर पुढील काही तासात 2792.75 m3/sec पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येईल. त्यामुळे धरणामधुन एकूण 2792.75 क्युसेक होणार आहे.
- गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले, 8598 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु ( Date -7/16/22 9:06 AM )
Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता प्रकल्पाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले असून, 8598 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलं आहे - अशी माहिती बातमी एक्सपेसला देण्यात आली आहे.
आठ दिवसांपासून गोसीखुर्द प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने केला जात आहे. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.