मुंबई : आज सर्वोच्य न्यायालयात (Supreme Court) ओबीसी आरक्षण (OBC Reservation) यावर सुनावणी पार पडली, आणि राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळं ओबीसींना आता राजकीय आरक्षण मिळणार असून, आरक्षणासह राजकीय निवडणुका होणर आहेत, असा कोर्टानं निर्णय (Court result) दिला आहे. त्यानंतर आता राज्यातून विविध प्रतिक्रिया येत आहेत, दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) यावर आपली प्रतिक्रिया देताना, सर्वोच्च न्यायालयानं बांठिया आयोगाच्या अहवाल (Reports of the Banthia Commission) मान्य करुन त्यानुसार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका (Palika election) तात्काळ घेण्याचा दिलेला आदेश हा राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या हक्कांसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे. असं अजित पवार म्हणाले. (MVA and Victory of honest efforts for the rights of OBC, Ajit Pawar)
दरम्यान, तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackreay) साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार (Chhagan Bhujbal, Dhananjay Munde, Vijay Wadettiwar) तसंच अन्य नेत्यांनी ओबीसी आरक्षणासाठीची लढाई आज यशस्वी करुन दाखवली. शरद पवार साहेबांनी त्याकाळात राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आणि राज्यात ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला. ते आरक्षण अबाधित राहिलं, याचा मनापासून आनंद आहे. ओबीसी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचं काम सुरुवातीपासून आम्ही केलं. हीच भूमिका यापुढेही कायम राहील.
राज्यातील ओबीसी बांधवांच्या एकजुटीतून तसंच संपूर्ण महाराष्ट्रानं ओबीसी आरक्षणाला दिलेल्या एकमुखी पाठिंब्याच्या बळावर हे यश मिळालं आहे. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवूया. अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले असून, ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.