- Read Also: ब्रम्हपुरी : लाडज गावाच्या भोवताल महापूर, डोंगा प्रवास बंद तर प्रशासन अलर्ट
जुलै १४, २०२२
0
गोसीखुर्द धरणामधुन पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 15000 क्युमेक्स पर्यंत पुन्हा वाढविण्यात येईल अशी मोठी शक्यता दर्शविण्यात आली आहे. याप्रकारची माहिती बातमी एक्सपेसला न्युज मीडिया नेटवर्कला देण्यात आली आहे. (Gosikhurd Flood Live 2022 )
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, नागभिड, ब्रम्हपुरी तालुक्यात सिंचनाकरिता गोसेखुर्दचे पाणी वापरण्यात येते मात्र भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये ह्यासाठी धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले असल्याने जिल्ह्यातील ह्या भागात पाण्याचा मोठा ओघ येऊन ह्या तीनही तालुक्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर नदी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ब्रम्हपुरी , मूल, सावली, पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्यातील नदीलगतच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीलगतच्या गावकऱ्यांनी काळजी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
धापेवाडा बॅरेजचा विसर्ग 6322 क्युमेक्स व माथनी सरितामापन केंद्राचा विसर्ग 6470 क्युमेक्स असा एकूण येवा 12792 क्युमेक्स आहे. भंडारा येथे पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते व धरणाची पातळी कमी करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रात्री 7 वाजता 12 गेट 1.5 मिटरने तर, 21 गेट 1 मिटरने उघडून त्यातून 8372 क्युमेक्स पाणी सोडण्यात येत होते. मात्र, जलसाठ्यात वाढ झाल्याने रात्री 10 वाजता पाणी विसर्गाचे प्रमाण वाढविले आहे. गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे ( Gosikhurd Dam Open 33 Gates) उघडण्यात आले असून यापैकी 21 गेट 2 मिटरने तर उर्वरित 12 गेट 1.5 मिटरने उघडण्यात आले आहेत. या सर्व दरवाज्यातून 12306 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. त्यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.