तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli & Gosikhurd Flood 2022: वडसा-आरमोरी ते चिचडोह पर्यंतच्या नदीलगतच्या गावांना विशेष काळजी घेण्याची गरज - #BatmiExpress

Gadchiroli News,Gadchiroli Rain,Gadchiroli Flood 2022,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Heavy Rain,Gadchiroli Batmya,wadsa,Armori,Gosikhurd Flood

Gadchiroli News,Gadchiroli Rain,Gadchiroli Flood 2022,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Heavy Rain,Gadchiroli Batmya,wadsa,Armori,Gosikhurd Flood Live,Gosikhurd,Goshikhurd,

गडचिरोली
गेल्या तीन चार दिवसात विदर्भात सतत मुसळाधार पाऊस पडत आहे. चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य जिल्ह्यात रेड अर्लट घोषित करण्यात आलेला आहे. सततच्या मुसळाधार पावसामुळे नदींच्या खोऱ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. वर्धा तसेच चंद्रपूर जिल्हृयातील पाणीही आपल्याकडे वर्धा नदीमार्फत चपराळा येथून वैनगंगेला मिळत आहे.

आणि आता गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी वाढल्याने आज रात्रीपासून धरणातून जास्त पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुढिल सात तासानंतर वडसा, आरमोरी व गडचिरोली येथील वैनगंगा नदी पात्रात व जवळील नाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी धोका पत्करुन नदी नाले ओलांडू नये. त्यामुळे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी नागरिकांना घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.गडचिरोली जिल्हयात बहूतेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी घरातच कुटुंबाबरोबर वेळ घालवावा. आता येत्या शनिवार पर्यंत प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवल्या आहेत.

नागरिकांनी फिरण्यासाठी अथवा अति महत्त्वाचे काम नसताना बाहेर पडल्यास आपल्यासह आपल्या कुटुंबाला धोका निर्माण होवू शकतो. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे.

त्यामूळे नैसर्गिक आपत्तीला टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.वैनगंगा नदीकाठावरील वडसा, आरमोरी व गडचिरोलीतील गावांना सर्तकतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात येत असून नागरिकांनी नदी नाले ओलांडण्याचे टाळावे. पाणी पुलावरुन वाहत असतांना नागरिकांनी पुल पार करु नये असे प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.