चंद्रपूर (Chandrapur Flood 2022) - सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नागरिकांना पुराचा मोठा फटका बसला आहे.
- इरई (७ दरवाजे)
- गोसेखुर्द ( ३३ दरवाजे )
सध्या जिल्ह्यातील रहमतनगर, सिस्टर कॉलोनी, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर नगर येथे पुराचे पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम चंद्रपूर मनपा प्रशासन द्वारा सुरू आहे.
आतापर्यंत एकूण 677 कुटुंबांना मनपा बचाव पथकाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. नगीनाबाग प्रभागात पुराचे पाणी शिरले असून दुमजली इमारतीच्या सभोवताल पाण्याने वेढा घातला आहे. नागरिक सुद्धा या पावसाचा आनंद लुटत आहे. परंतु जिल्हयातील जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे.
- पूरबाधित क्षेत्रे (सद्यस्थिती ) - रहमत नगर, सिस्टर कॉलोनी,राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलोनी, आंबेडकर भवन वडगाव.
- रेस्क्यु ऑपरेशन अंतर्गत सुरक्षीत स्थळी नेण्यात आलेल्या पूरबाधितांची संख्या - ६७७ (सद्यस्थिती )
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.