चंद्रपूर: जिल्ह्यात सतत पाच दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नदी - नाले भरभरून वाहू लागले आहेत. त्यामुळे जिह्यातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. मुलगा तापाने फणफणत होता. पोडसा गावात आरोग्य सूविधा नाही. नदी - नाले भरभरून वाहू लागले त्यामुळे आरोग्य सेवा पोहचू शकत नाही. बापाच्या मनात एकच विचार कि मुलाला वेळेवर उपचार मिळावं यासाठी चक्क मुलाला खांद्यावर घेत बापाने पुरात पाय ठेवला. पुराततून पायी शोध मार्ग काढीत मुलावर वेळेवर उपचार करण्यासाठी दुसऱ्या जवळील गावात घेऊन गेला. श्यामराव पत्रूजी गिनघरे असे या जिगरबाज बापाचे नाव आहे. तो गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील रहीवासी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सतत पाच दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केल आहे. यामुळं वर्धा, वैनगंगा नदीला पुर आला. महाराष्ट्राच्या अगदी शेवटचा टोकावर असलेले पोडसा हे गाव वर्धा नदीचा काठावर वसले आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळं गावाला बेटाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. गावातील श्यामराव पत्रूजी गिनघरे यांचा मुलगा कार्तिक याला ताप आला. मुलगा तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सूविधा नाही. मग बापाकडे फक्त एकच मार्ग तो म्हणजे जवळील दुसऱ्या गावी जाऊन खाजगी डॉक्टर कडून त्वरित उपचार करणे - हीच बाब बापाच्या मनात होती . परंतु दुसरीकडे दुसऱ्या गावाला जाणारे सर्व मार्ग पुराने वेढलेले.
मात्र, बाप तो बाप.मुलाचा ताप काळजी वाढविणारा ठरला. पोडसा गावापासून पाच ते सहा कि.मी. अंतरावर वेडगाव गाव आहे. येथे खाजगी डॉक्टर आहेत. मुलाला खांद्यावर वर घेऊन भर पुरातून श्यामराव मार्ग काढीत गेला. मुलावर उपचार केला अन परत पुरातून मार्ग काढीत पुन्हा गावाकडे परतला.