ना वऱ्हाड, ना वर मात्र, लग्नाचा मंडप पडणार असून वधू वराशिवाय सात फेरे घेणार आहे. ऐकून नवल वाटलं ना. पण हे खरं आहे. याची प्रचिती गुजरातमधल्या वडोदऱ्यात दिसून आलीय. वडोदरा इथं राहणाऱ्या क्षमा बिंदूचे येत्या 11 जूनला लग्न आहे. मात्र, ती हे लग्न वराशिवाय करणार आहे. अर्थात तिने स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या क्षमा तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असून तीन लग्नासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची खरेदी केली आहे. तिनं घागरा, ज्वेलरीसह पार्लर सर्व काही बुक केलंय. क्षमा स्वतःशीच लग्न करणार असली तरी या लग्नाची खास गोष्ट म्हणजे सर्व रितीरिवाजांसह हे लग्न पार पडणार आहे. ती अगदी सात फेरे घेण्यापासून ते सिंदूर लावण्यापर्यंत सर्व विधी या लग्न सोहळ्यात पार पडणार आहे. फक्त लग्नच नाहीतर तिने हनिमूनसाठी गोव्याला जाण्याचा बेत आखलाय. तिच्या या निर्णयाला घरच्यांनी देखील पाठिंबा दर्शवला असून क्षमा हनिमूनसाठी जवळपास दोन आठवडे गोव्यात असणार आहे.
...म्हणून तिनं निर्णय घेतला
सर्वसामान्यपणे लोकं ज्या व्यक्तीवर प्रेम करतात त्या व्यक्तीशी लग्न करतात. क्षमाचं स्वतःवर प्रेम असल्याने तिनं स्वतःशी लग्न करत आहे. दरम्यान, आपल्या देशात ‘सोलो लग्न’ करणारी क्षमा बिंदू ही पहिलीच मुलगी असणार आहे. त्यामुळे या जगावेगळ्या या स्वयं-विवाहाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.