Corona Update Maharastra: महाराष्ट्रात आज 1,045 नवीन कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 700 हून अधिक नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली. दरम्यान, राज्यातील कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड-19 टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. फेब्रुवारीनंतर प्रथमच, बुधवारी महाराष्ट्रात दररोज 1,000 हून अधिक कोविड -19 प्रकरणांची नोंद झाली.
दरम्यान गेल्या काही दिवसांत दैनंदिन कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी दिवसभरात 782 कोरोना रुग्ण आढळून आले होते. (Corona Outbreak Maharastra )
महाराष्ट्रात कोरोना आकडेवारी | महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट:
- 30 मे → 441
- 31 मे → 711
- 01 जून → 1081
- 02 जून → 1,045
- 30 मे → 318
- 31 मे → 506
- 01 जून → 739
- 02 जून → 704
कोरोना टास्क फोर्सच्या गाईडलाईन्स:
- कोविड चाचण्या वाढवा - टेस्टिंग लॅब सुस्सज ठेवा
- १२ ते १८ वयोगटातील व्यापक लसीकरण मोहीम राबवा
- बुस्टर डोस सक्तीचा करावा
- जम्बो हॉस्पिटल तयार ठेवा पुरेसा स्टाफ नियुक्त करा
- वार्ड स्तरावर पुन्हा कोरोना वॉर रम उभारा
- वॉर्डनिहाय कोरोना रुग्णाचा दैनंदिन आढावा घ्या
- मालाडचं जम्बो कोव्हीड सेंटर हॉस्पिटल तयार ठेवा