Big News! एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांकडून पोलीस पाटलाची हत्या | Batmi Express

Be
0

 

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Naxal,Gadchiroli Batmya,Etapalli,

प्रतिनिधी / एटापल्ली : गावातील तेंदूपत्ता फळीवर मुन्शी (दिवाणजी) म्हणून काम पाहात असलेल्या पोलीस पाटलाचे रात्री अपहरण करून नक्षलवाद्यांनी मंगळवारच्या पहाटे धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली. हे हत्याकांड एटापल्ली तालुक्यातील दोडूर या गावात घडले. कुल्ले वज्जा कौशी (५५ वर्षे) असे मृत पोलीस पाटलाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, हेडरी उपविभागांतर्गत गट्टा उपपोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोडूर गावात सध्या तेंदूपत्ता हंगाम जोमात सुरू आहे. या फळीवर काम पाहत असताना कुल्ले कौशी यांना रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सोबत नेले. जंगलात त्यांची हत्या करून पहाटे त्यांचा मृतदेह गावाबाहेर आणून टाकला. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे स्पष्ट होऊ शकले नाही. दुपारी मृतदेह शवविच्छेदनासाठी एटापल्लीत आणण्यात आला. पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->