तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

#Exclusive Chandrapur: डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात, या अपघातात 9 जणांचा मृत्यू | Batmi Express

Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Today,Maharashtra,Accident,

Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Today,Maharashtra,Accident,

चंद्रपूर
:- मूल मार्गावरील अजयपूरजवळील रिव्हरव्ह्यूजवळ येथे लाकडांनी भरलेला ट्रक व डिझेल टँकर समोरासमोर धडकले. या अपघातानंतर भीषण आग लागून दोन्ही वाहनांतील चालकांसह ७ मजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा अपघात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मूलमार्गावरील अजयपूर गावाजवळ घडला.

प्राप्त माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास लाकूड भरलेला ट्रक चंद्रपूरच्या दिशेने जात होते. तर, डिझेल भरलेला एक टँकर चंद्रपूरकडून येत होता. दरम्यान, अजयपूरजवळ या दोन्ही वाहनांची धडक होऊन आग लागली. यावेळी एका वाहनात लाकूड व दुसऱ्या वाहनात डिझेल असल्याने जोरदार भडका उडाला. यावेळी लाकडू असलेल्या वाहनातील चालकासह ६ मजूर, डिझेल असलेल्या वाहनातील तिघेजण अशा एकूण ९ जणांंचा होरपळून मृत्यू झाला.

चालक अक्षय सुधाकर डोंगरे (३०) बीटीएस प्लॉट बल्लारशा, मजूर प्रशांत मनोहर नगराळे (२८), कालू प्रल्हाद टिपले (३५), मैपाल आनंदराव मडचापे (२४),बाळकृष्ण तुकाराम तेलंग (४०),साईनाथ बापूजी कोडापे (३५), संदीप रवींद्र आत्राम (२२) सर्व राहणार दहेली व टँकरचालक हाफिज खान (३८) अमरावती, मजूर संजय पाटील (३५) वर्धा अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
या अपघातामुळे संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने मूल व चंद्रपूर मार्गावरील वाहतूक खंडित झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तसेच, चंद्रपूर,बल्लारशा, सीटीपीएस चंद्रपूर, पोंभूर्णा, मुल येथून अग्निशमन वाहन बोलाविण्यात आले. आग आटोक्यात आली असली तरी आज सकाळी ९ वाजेपर्यंत टँकर जळतच होता. सकाळीच अग्निशमन गाडीने पुन्हा आग विझवण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून सर्व जळालेले मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.