तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

धक्कादायक! धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Batmi Express

Bhandara,Bhandara Batmya,Bhandara Live,Bhandara News,Bhandara rape case,Bhandara Today,Bhandara Marathi News,Bhandara Crime,Sakoli,

Bhandara,Bhandara Batmya,Bhandara Live,Bhandara News,Bhandara rape case,Bhandara Today,Bhandara Marathi News,Bhandara Crime,Sakoli,

भंडारा
: धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातून समोर आली आहे. साकोली पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीनंतर साकोली पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली आहे. राजेश ईश्वर मडावी वय 19 वर्ष या बोदरा येथील रहिवासी असलेल्या आरोपीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

नागपूर येथे फिरायला जाण्याचा बहाण्याने आरोपी राजेश अल्पवयीन मुलीला साकोली येथून बसने घेऊन गेला. रात्रीची वेळ असल्यानं आणि बसमध्ये वाहक नसल्याचं पाहून आरोपीने बसच्या शेवटच्या सीटवर धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग केला. नागपूरला पोहोचल्यानंतर राजेश तिला घेऊन आपल्या नातेवाइकाकडे गेला. मात्र नातेवाईकाला ही संपूर्ण परिस्थिती संशयित वाटल्याने त्यांनी राजेशला ताबडतोब घरातून निघून जाण्यास सांगितलं.

नाईलाजाने राजेश अल्पवयीन विद्यार्थिनीसह रात्रीच बोदरा येथे परतला. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरू केला तेव्हा बोदराच्या पोलीस पाटलांनी बेपत्ता विद्यार्थिनी राजेश मडावीसोबत गावातच असल्याची माहिती पोलिसांना दिली. 

पोलिसांनी बोदरा गाव गाठून अल्पवयीन विद्यार्थिनी आणि राजेश मडावी यांना ताब्यात घेतलं. दोघांचीही साकोली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्या आधारावर पोलिसांनी आरोपी राजेश मडावी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास साकोली पोलीस करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.