KGF Chapter 2 Box Office Collection: ‘केजीएफ 2’ ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, अनेक चित्रपटांच्या कमाईचे मोडले विक्रम

KGF Chapter 2,KGF 2 Box Office Collection,Entertainment,Entertainment News,

KGF Chapter 2,KGF 2 Box Office Collection,Entertainment,Entertainment News,

सुपरस्टार यशच्या (Yash) ‘केजीएफ 2’ (KGF Chapter 2) या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई (KGF 2 Box Office Collection) केली आहे. प्रशांत नील (Prashanth Neel) दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. ‘केजीएफ 2’च्या हिंदी व्हर्जनने बंपर कमाई करत अनेक मोठ्या चित्रपटांना पछाडलं आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी ५३.९५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर भारतात १३४.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तरण आदर्शने ‘केजीएफ 2’ च्या कमाईच्या आकड्याची माहिती दिली आहे. ‘वॉर’, ‘ठग्स ऑफि हिंदोस्तान’ यांसारख्या चित्रपटांना ‘केजीएफ 2’ ने मागे टाकलं आहे.

कमाईत सरशी
केजीएफ 2- ५३.९५ कोटी रुपये

वॉर- ५०.७५ कोटी रुपये
ठग्स ऑफ हिंदोस्तान- ५०.७५ कोटी रुपये


यशच्या ‘केजीएफ- चाप्टर 1’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचा लाइफटाइम बिझनेस ४४.०९ कोटी रुपये इतका झाला होता. हा आकडा यशच्या ‘केजीएफ- चाप्टर 2’ने पहिल्याच दिवशी पार केला आहे. कमाईचा हा आकडा पाहता येत्या काही दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतरही चित्रपटांचे विक्रम मोडणार, यात काही शंका नाही.

 


ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही या चित्रपटाने एस. एस. राजामौली यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटाचाही विक्रम मोडला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे चार दिवस राहिले असताना केजीएफ 2च्या हिंदी व्हर्जनची जवळपास ११ कोटी रुपयांची तिकिटं विकली गेली होती. या तुलनेत आरआरआरच्या हिंदी व्हर्जनचं फक्त ५ कोटी रुपयांचं ॲडव्हान्स बुकिंग झालं होतं. चित्रपट व्यापार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, या कन्नड चित्रपटाने उत्तर भारतात ॲडव्हान्स बुकिंगद्वारे जवळपास २० कोटी रुपयांची कमाई केली. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.