चंद्रपूर :- मोठा भावाचा पुण्य स्मरणाचा कार्यक्रम आटोपून घरी – जात असताना चीचपल्ली जवळ लहान भावाच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याने त्या अपघातात सासू – सुनेचा जागीच मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी चंद्रपुरात मोठ्या भावाच्या पुण्य स्मरणाचा कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी अनिल पारखी आपल्या कुटुंबियांसह चंद्रपूर ला आपल्या घरी आले होते. दिवसभर कार्यक्रम आटोपून १५ एप्रिलला सकाळी कर्तव्यावर रुजू व्हायचे असल्याने अनिल पारखी कुटुंबियांसोबत चामोर्शी ला जायला निघाले असतांना चिचपल्ली जवळ पोहचल्यावर वाटेत अचानक जनावर आडवे आल्याने चारचाकी वाहन क्रमांक Mh 33 V 9688 चे नियंत्रण सुटले, चारचाकी वाहन ४ वेळा पलटी होत नवीन बनलेल्या पुलाच्या खाली कोसळले.
या अपघातात सासू – सुनेचा जागीच मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाले आहे. अपघात गंभीर झालेल्या ६ जणांच्या उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.