मोठी बातमी! दादरजवळ लांब पल्ल्याच्या 2 गाड्या एकमेकांवर आदळल्या - Batmi Express

Be
0

Accident,Accident News,Accident News Live,rail accident,

दादर-पॉन्डिचेरी या लांब पल्ल्याच्या गाडीचे मागचे तीन डबे रेल्वे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर येते आहे. आतापर्यंत यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचप्रमाणे कुणालाही दुखापत झाल्याचं वृत्त हाती आलेलं नाही. नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही घटना घडली. गाडी नंबर 11005 असा या गाडीचा नंबर आहे. दरम्यान, सुरुवातीला दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या इंजिनची टक्कर झाल्याचंही सांगितलं जातंय. 

मात्र याबाबतच्या वृत्ताला अद्याप दुचोरा मिळू शकलेला नाही. सध्या या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या दादर मार्गावर झालेल्या या घटनेमुळे आता दादर पॉन्डिचेरी या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. 

सध्या या गाडीतील प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून स्टेशन गाठण्यासाठी धावपळ केली आहे. सुरुवातीला नेमकं काय झालंय, हे देखील प्रवाशांना कळायला काही मार्ग नव्हता. या संपूर्ण प्रकाराबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून आता नेमकी काय माहिती दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->