संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्यामधील एका गटाने आक्रमक भूमिका घेऊन थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरासंमोर आंदोलन करायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणात जमले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
हे सुद्धा वाचा
आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यासाठी निवासस्थानाबाहेर सुप्रिया सुळे (Supriya Sule) आल्या आहेत. शांततेने चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.माझे आई-वडील आणि मुलगी घरात आहेत, त्यांना भेटून येते आणि तुमच्याशी बोलते, खासदार सुप्रिया सुळे असं आश्वासन त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलं आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अजूनही त्या ठिकाणी आंदोलक आंदोलन करताना दिसत आहेत.या आंदोलनानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकिय निवासस्थानाच्या बाहेर पोलीसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन पुन्हा आझाद मैदानात नेलं जात आहे. अजूनही काही कर्मचारी पवारांच्या निवासस्थानाबाहेर आहे. तर घटनास्थळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखल झाले आहे. सदावर्तेंच्या बगलबच्च्यांनी हे केलेले आहे. आम्हाला आदेश दिले तर आम्ही घरात घुसून मारू असे म्हणत आंदोलनस्थळी रष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.