आज दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान वेकोलीच्या बल्लारपूर काॅलरी ३&४ फीट रेल्वे सायडिंग कडून येणाऱ्या रेल्वे ने धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
बल्लारपूर : चंद्रपुरातील वेकोलीच्या बल्लारपूर रेल्वे सायडिंग परिसरातील एक धक्कादायक व दुर्दैवी घटना घडल्याची माहिती असून आज दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान वेकोलीच्या बल्लारपूर काॅलरी ३&४ फीट रेल्वे सायडिंग कडून येणाऱ्या रेल्वे ने धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Read also: अन्...तरूणीच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी 200 पोलिस अधिकारी गुंतले तपासात
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुणाचे नाव दिलीप बल्ला वर्मा वय (२२) वर्ष असून तो बल्लारपूर शहरातील डॉ.आंबेडकर वार्ड येथील निवासी आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी तात्काळ धाव घेतली असून या संदर्भातील पुढील तपास सुरू आहे मात्र या दुःखद घटनेमुळे या परिसरात शोकमग्न वातावरण पसरले आहे.