यवतमाळ : शेतकऱ्यांच्या समस्या या काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही. परंतु, या समस्यांमुळे जीव गमवावा लागणे, यासारखी दुसरी दयनीय परिस्थिती नाही. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे. अशीच एक आत्महत्येची घटना घडली आहे. नापिकीमुळे शेतकऱ्याने स्व:ताच्या शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना ६ एप्रिलला सांयकाळच्या सुमारास घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे घडली आहे.
हे सुद्धा वाचा
बबन मारोती सुरपाम (वय ४५) रा. राजुरवाडी, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही वर्षापासून शेतात नापिकीमुळे त्यांचा संसार मोडकळीस आला होता. त्यात मुलीचे लग्न असल्यामुळे बबनराव नेहमी चिंताग्रस्त असायचे, या कारणांमुळे बबन यांनी स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. मृत बबन यांच्याकडे कोरडवाहू तीन एकर शेती आहे. त्यांच्या आत्महत्यामुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सोनुले यांच्या नेतृत्वाखाली जमादार संजय जाधव करीत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.