'
30 seconds remaining
Skip Ad >

संघर्षाचा महामेरू म्हणजे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर - महेंद्र ब्राम्हणवाडे | Be Wadsa

0

wadsa,Wadsa News,Desaiganj,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,

  • बाबासाहेबांचे विचार घरा घरा पर्यत पोहचवून संविधान जनजागृती करावे - माजी आम.आंनदराव गेडाम
वडसा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले सत्याग्रह, धर्मांतराचा घेतलेला निर्णय आणि मानवाच्या न्याय- हक्कांसाठी संविधानिक लढा हे संघर्षाचे प्रतिकात्मक रूप होते. हजारो वर्षांपासून इथल्या दलित- शोषित- पीडितांचे माणूस म्हणून जगण्याचे सर्वच अधिकार हिरावून घेतलेल्या व शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मूक लोकांमध्ये स्फूर्ती व नवऊर्जा निर्माण करण्याचे काम बाबासाहेबांनी केले असून ते खरे संघर्षाचे महामेरू होते असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. मौजा कोंढाळा तालुका वडसा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाच्या उद्घाटन समारोह प्रसंगी ते बोलत होते. 

wadsa,Wadsa News,Desaiganj,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,

तर बाबासाहेबांचे विचार घरा घरा पर्यत पोहचवून संविधान जनजागृती करावे असे मत आरमोरी विधानसभेचे माजी आम.आनंदराव गेडाम यांनी व्यक्त केले ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते, यावेळी मुख्य अतिथी म्हणून ऍड.संजय गुरू, सरपंच अपर्णा राऊत, उपसरपंच गजानन सेलोटे, माजी जि.प.सदस्य विश्ववनाथ भोवते, पो.पा.किरणताई कुंभलवार सह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रात उतुंग भरारी घेणारे  युवक काँग्रेसचे आरमोरी विधानसभा अध्यक्ष अक्षय भोवते, प.स.देसाईगंज माजी उपसभापती नितीन राऊत, टेम्भुरने सर, AWD कार्यालय रविंद्र उरकुडे, प्रवीण रहाटे पत्रकार आरमोरी, सह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठया संख्येने गावकरी व समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×