भद्रावती नागमंदिरातून देवदर्शनाहून परणाऱ्या वाहनाचा अपघात; दोन ठार, पाच जखमी - Be Chandrapur

Chandrapur,Chandrapur Accident,Bhadrawati,Chandrapur Accident News,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News,Chandrapur Today,

Chandrapur,Chandrapur Accident,Bhadrawati,Chandrapur Accident News,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News,Chandrapur Today,

चंद्रपूर
: भद्रावती येथून नाग मंदिराचे दर्शन घेऊन वणी येथे गावी परतणाऱ्या वाहनाला वरोरा जवळील नंदोरी फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. यात दोन भाविक महिलांचा मृत्यू झाला असून पाच व्यक्ती जखमी आहे. ही घटना काल मंगळवारी (12 एप्रिल 2022) ला रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.

चंद्रभागा सुधाकर गौरकार व मनीषा रोगी रा. वरझडी (बंडा) असे अपघातातील मृत महिलांची नावे आहे तर भाग्यश्री मनोज रोगे (26), सावी मनोज रोगे (4), सविता रमेश हरडे (45) रा. वरझडी व वणी येथील अनिरुद्ध महादेव तपासे, महादेव रामराव तपासे हे पिता पुत्र देखील जखमी झाले आहेत.

वणी तालुक्यातील वरझडी (बंडा) येथील भाविक भद्रावती येथील नाग मंदिरात देवदर्शनासाठी आले होते. या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामुळे सर्व भाविक काल मंगळवारी मंदिरात पोहोचले. देवदर्शन आणि जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री नऊ वाजताच्या सुमारास ते वणी आपल्या गावी परत जाण्याकरता निघाले. दरम्यान वरोरा नंदोरी मार्गावरील नंदोरी फाट्याजवळ भरधाव ट्रक ने कट मारल्याने भाविकांच्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहनाने पलटी मारली. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना स्थानिक रुग्णालयात हलविले. पोलिसांना माहिती दिली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी आहेत. महिलांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.