सिंदेवाही : तालुक्यातील मरेगाव येथील जंगल परिसरात दुपारच्या सुमारास अंदाजे ३ ते ५ किलोचा काळ्या रंगाचा धातुचा गोळा मिळाला आहे. मिळालेल्या या गोळ्याला गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे आणण्यात आले आहे. लाडबोरीची घटना ताजीच असताना, आज दिनांक ३ एप्रिल ला सकाळी पवनपार – टेकरी जंगल परिसरात मोहफूल वेचण्याकरिता गेलेल्या काही नागरिकांना एक काळ्या रंगाचा गोळा पडलेला दिसून आला आहे.
तर, दूसरा गोळा मरेगाव येथील रत्नमाला रमेश नैताम ह्या मोहफूल वेचण्याकरिता जंगल परिसरात गेल्या होत्या यांना, एक मोठा अंदाजे ३ ते ५ किलोचा असलेला काळ्या रंगाचा धातूचा गोळा दिसून आला आहे. नैताम यांनी ही माहीती सरपंच देवानंद सहारे यांना दिली. सरपंच व गावकरी नैताम यांना घेऊन त्या ठिकाणी पोहचून त्या गोळ्याला ग्रामपंचायत कार्यालयात आणले व याची माहिती तालुका प्रशासनाला दिली.
न्यूझिलंडमधील महिया बेटावरून एका रॉकेट लॅब कंपनीने एक इलेक्ट्रॉन लाँच केले होते. ते पृथ्वीच्या सर्वात खालच्या कक्षेत सोडले होते त्यामुळे, ही रिंग त्या रॉकेटचाच भाग असल्याचे स्काय वॉच गृपचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांचे म्हणणे आहे. आकाशातून पडलेल्या या गोळ्या विषयीचे गूढ अजूनही कायम आहे. परंतु, या रिंग सारख्या वस्तू व गोळ्यांमुळे कुठलीही हानी नसल्याबाबतचा दिलासा पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तर, या सर्व वस्तू म्हणजे नेमक काय आहे. याबाबत सक्षम यंत्रणांनी माहिती देण्याची गरज असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने इसरो व अन्य संस्थांना यासंदर्भात पत्र दिले आहे.