'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रेकिंग धक्कदायक! भद्रावतीत गळा कापलेल्या निवस्त्र अवस्थेत युवतीचा मृतदेह आढळला - Batmi Express

0

Bhadrawati,Chandrapur Crime,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,

भद्रावती
:- भद्रावती तालुक्यातील सुमठाणा तेलवासा रस्त्यावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारती समोर शेतशिवारात एका अज्ञात युवतीचा शिरच्छेद केलेला नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सदर मृतदेह नागरिकांना आढळून आला. याबाबत भद्रावती पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिस लगेच घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचे मुंडके व कपडे गायब असल्याने त्या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. सदर घटनेची माहिती शहरात पसरताच बघ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. चंद्रपूरवरुन श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मुंडक्याचा शोध घेण्यासाठी परिसर सील करण्यात आला होता. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच चंद्रपूरवरुन पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली आहे.
मृतक युवती ही अंदाजे २०-२२ वर्षांची असल्याचे समजते. वृत्त लिहीपर्यंत युवतीची ओळख पटली नव्हती. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

प्रतिनिधी : जितेंद्र माहुरे भद्रावती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×