मी युगुलांमध्ये भर रस्त्यात होणारी भांडणं अनेकांसाठी मनोरंजनाचा विषय असतो. मात्र शाब्दिक वादावादी तुंबळ हाणामारीत रुपांतरित झाली, तर रस्त्यावरचे बघे हस्तक्षेप करतात.
गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डमध्ये सुरु असलेल्या वादावादीत एका फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने मध्यस्थी केली, मात्र प्रेयसी या मध्यस्थी करणाऱ्या तरुणालाच शिवीगाळ करु लागल्याने त्याचाही पारा चढला आणि त्याने या तरुणीलाच चोप दिला. ओडिसातील भुवनेश्वरमध्ये मंगळवारी हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ :
Girl direct volley of expletives, beat up Boyfriend in full public glare outside #IG Park in #Bhubaneswar pic.twitter.com/7ZVUrfz7Wd
— Mohammad Suffian (@iamsuffian) March 31, 2022
असं नेमकं काय घडलं? :
व्हिडिओमध्ये एक तरुणी तिच्या प्रियकराला बोलबच्चन देता देता शारीरिक चोपही देताना दिसत आहे. मध्येच ती त्याच्यावर दगडफेक करताना पाहायला मिळतं. घटनास्थळी जमलेल्या प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणी आणखीनच संतापली. तिने एका वाटसरुचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.
डिलिव्हरी बॉयची मध्यस्थी :
हा प्रकार सुरु असतानाच एका फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने हस्तक्षेप करुन भांडणाऱ्या जोडप्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने वापरलेल्या अपशब्दांवर त्याने आक्षेप घेतला. त्यामुळे रागाच्या भरात तरुणीने डिलिव्हरी बॉयलाही शिवीगाळ करायला सुरुवात केली. इथे भावाचं टाळकं सटकलं. अखेर त्यानेही तरुणीला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर तो तिलाही चोप द्यायला लागला.
व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय तरुणीला धक्काबुक्की करताना आणि थप्पड मारताना दिसत आहे. चकित झालेल्या बघ्यांनी अखेरीस हस्तक्षेप करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तरुणी किंवा डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह या दोघांपैकी कोणीही अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.