'
30 seconds remaining
Skip Ad >

भामरागड: युवतीची हत्या करणारा दुसरा तिसरा नसून; सरपंचाचा मुलगा होय! Be Gadchiroli

0

Bhamragad,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli Crime,murder,

भामरागड : 
तालुक्यातील मन्नेराजाराम (गेर्राटोला) येथील मीना येर्रा सिडाम या युवतीची रहस्यमय हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून ज्याच्यावर संशय होता तो सरपंच रंगा मडावी यांचा मुलगा अविनाश हाच असल्याचे अखेर स्पष्ट झाले.

आरोपी अविनाश याला तेलंगणातील करीमनगर येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मीनाचा मृतदेह शेत शिवारातील नाल्यात जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आढळला होता. एकूण परिस्थितीवरून तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा आरोपीचा हेतू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दामरंचा उपपोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरविणे सुरू करताच सरपंचाचा मुलगाच गावातून गायब झाला. त्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडे वळली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून त्याला अलगद टिपले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दामरंचा ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन घोडके, उपनिरीक्षक राजेंद्र कपले, अंमलदार प्रशांत गरपडे, सुजितकुमार शिखरे, श्रीहरी बडे यांच्या पथकाने अविनाशला ताब्यात घेऊन बोलते केले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने खून कशासाठी केला, हे लवकरच उघड हाेईल.

अन् कुत्र्यांनी हाणून पाडला आरोपीचा डाव
हत्येनंतर मीनाचा मृतदेह लपविताना आरोपी अविनाशने मृतदेह गाडल्यानंतर खड्डा केल्याचे दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. वरून गवतही टाकले होते. मीनाचा मृतदेह आता कोणाला सापडणारच नाही अशा विश्वासाने आरोपी बिनधास्तपणे गावात वावरत होता. पण कुत्र्यांनी त्याचा डाव हाणून पाडला. त्यांच्या तीक्ष्ण नाकाने मृतदेहाचा वास ओळखला आणि थोडी माती उकरली. त्यातून मीनाची ओढणी बाहेर आली. त्या ओढणीनेच शेवटी मृतदेह तिथे गाडला असल्याचे दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×