आजपासून महाराष्ट्रात दहावीची परीक्षा सुरु
SSC Exam 2022: दहावीची लेखी परीक्षा आज 15 मार्चपासून सुरू होत आहे. राज्यातील 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून 21 हजार 384 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेची वैशिष्ट्ये
- ● 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित पेपर
- ● 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे
- ● 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे जादा
- ● प्रश्नपत्रिका वाचनासाठी अतिरिक्त 10 मिनिटे
- ● अपंग विद्यार्थ्यांना प्रतितास 20 मिनिटांचा अधिक वेळ मिळणार
- ● विद्यार्थ्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्र असणार
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.