गडचिरोली: दोन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला विहिरीत...! - Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,

गडचिरोली (Gadchiroli News ) 
:- गडचिरोली शहरालगत असलेल्या नवेगाव येथील दोन दिवसापसून बेपत्ता असलेल्या 27 वर्षीय युवकाचा मृतदेह मंगळवार दिनांक 15 मार्च ला सकाळच्या सुमारास नवेगाव बस स्टॉप जवळील विहिरीत आढळून आला. हेमंत रामचंद्र कोरडे (Hemant Ramchandra Korde ) वय 27 वर्ष रा नवेगाव कॉम्प्लेक्स ता जि. गडचिरोली असे मृतक युवकाचे नाव आहे. हेमंत सोमवारी पहाटे 1 वाजताच्या सुमारास घरून गेला.परंतु तो परत न आल्याने घरच्यांनी शोधा शोध सुरू केली.कटुबियांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार गडचिरोली पोलीस ( Gadchiroli Police Station ) ठाण्यात केली.परंतु दोन दिवस त्याचा शोध लागला नाही.

Read Also: Redmi Note 11 Pro | Redmi Note 11 Pro+ 5G Smartphone -  बापरे! कमी किंमतीत मिळणार हे सगळं फ्लॅगशिप फीचर्स

अखेर मंगळवारी सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. हेमंत टी पॉईंट चौकात पान ठेला चालवीत होता.परंतु नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम चालविल्याने त्याचा व्यवसाय काही दिवसापसून बंद होता. यामुळे तो विवंचनेत असल्याचे कळते.हेमंतच्या वडिलाचे यापूर्वीच निधन झाले असून तो एकुलता एक मुलगा होता.या घटनेने त्याच्या कुटूंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला हेमंतच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.