नवी दिल्ली : देशातील पाच राज्यातील निवडणुका झाल्यानंतर जी भीती व्यक्त केली जात होती, ती भीती अखेर खरी ठरली आहे, निवडणुकापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण हा अंदाज रोज खरा ठरताना दिसतोय. चार महिन्यांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे, सलग दोन दिवसांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीनंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींत प्रत्येकी 83 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर जारी करण्यात आले आहेत. त्यामुळं ग्राहकांच्या तसेच वाहन चालकांच्या खिशाला अतिरिक्त भुर्दड बसणार आहे.
दरम्यान, दरम्यान, जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलामुळं भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी वक्तव्य केलं आहे. मागील चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.40 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढले असून, डिझेलचे दर 85 रुपये प्रति लिटरनं वधारले आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 97.81 रुपये आणि डिझेलचा दर 89.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग अनेक दिवस वाढू शकतात.
एकिकडे कोरोनाचे संकट असताना, दुसरीकडे महागाईंच्या आगडोंबाने सामान्य माणूस होरपळून गेला आहे. रोजची महागाईमुळं सरकारच्या धोरणावर जनत त्रस्त झाली असून, सरकारला रोज लाखोली वाहित असते.
जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव?
शहरं | पेट्रोल (प्रति लिटर) | डिझेल (प्रति लिटर) |
मुंबई | 112.51 | 96.70 |
दिल्ली | 97.81 | 89.07 |
चेन्नई | 103.67 | 93.71 |
कोलकता | 107.18 | 92.22 |
भोपाळ | 109.85 | 93.35 |
रांची | 100.96 | 94.08 |
बंगळुरु | 103.11 | 87.37 |