मार्च २४, २०२२
0
चंद्रपूर:- शहर हद्दीत एक महिला तीन मुलींकडून देहव्यापार करून घेत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी तेथे धाड टाकली असता कुंटणखाण्यातील तीन पिडीत मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. त्या तीन पीडित महिलांना स्त्री आधार गृहात पाठवण्यात आले आहे.
चंद्रपूर शहर हद्दीतील गौतम नगर येथील एक महिला तीन मुलींकडून देह व्यापार करीत असल्याची तक्रार सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेने केली होती. पोलीस निरिक्षक बाळासाहे खाडे यांनी विशेष पथका मार्फत धाड टाकली असता एक महिला आर्थिक फायद्यासाठी तीन मुलीकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे आढळून आले. त्या महिलेला पोलीसांनी अटक केली आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.