'
30 seconds remaining
Skip Ad >

Gondia News: धक्कादायक! मुलाचे सांभाळ करण्यासाठी दिले अन् …. तिने मुलाला विकले चक्क सव्वा लाखात - Batmi Express

0

Gondia,Gondia Live News,Gondia Marathi News,gondia news,Gondia Crime,

गोंदिया ( Gondia News )
: एका महिलेने पहिल्या पतीपासून झालेला मुलला दुसऱ्या महिलेला सांभाळ करण्यासाठी दिले. तर, तिने स्वत: दुसरे लग्न केले, ती आई दोन वर्षांनंतर आपल्या मुलाची विचारपूस करण्यास गेली. परंतु, ज्या महिलेकडे आपला मुलगा दिला तिच्याजवळ आपला मुलगाच नाही, अशी खात्री पटताच आईने गोंदिया शहर पोलिसात धाव घेतली. गोंदिया पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केली असता त्या ६ वर्षांच्या मुलाची १ लाख २० हजार रुपयात भंडारा जिल्ह्यात विक्री केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी गोंदिया पोलिसांनी मुख्य सूत्रधार महिलेसह पाच जणांना अटक केली.

Most Read News

गोंदियातील इंदू (बदललेले नाव) हिला पहिल्या पतीपासून असलेला चिकू (बदललेले नाव) याला २०२० मध्ये गोंदियातील मंगला उर्फ मनीषा संतोष चंद्रिकापुरे हिच्याकडे सांभाळायला दिले होते. मंगला चंद्रिकापुरे हिने इंदूचे लग्न जळगावच्या चारडी येथील एका इसमाशी लावून दिले. तुझ्या मुलाचे मी संगोपन करेन, असे तिने इंदूला म्हटले होते. मंगलावर विश्वास ठेवून दुसरे लग्न करणारी इंदू मुलाच्या भेटीसाठी २२ फेब्रुवारी २०२२ रोजी गोंदियात आली असता आरोपी मंगलाकडे तिचा मुलगा नव्हता. तिने मुलासंदर्भात विचारपूस केली. त्यावेळी तिने उत्तर दिले नाही. 

तेव्हा, माझ्या मुलाचे अपरहण झाले असावे किंवा त्याची विक्री झाली असावी, असा संशय घेऊन त्या आईने गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली. गोंदिया पोलिसांनी १ मार्च रोजी या संदर्भात भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलीस माहिती काढत असतानाच तो मुलगा भंडारा जिल्ह्याच्या आंधळगाव येथे असल्याची माहिती मिळाली. साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस हवालदार जागेश्वर उईके, पोलीस नायक शिपाई योगेश बिसेन, छगन विठ्ठले, महिला पोलीस शिपाई व डीबी पथकाने इंदूला घेऊन आंधळगाव गाठून त्या बालकाला आपल्याजवळ घेतले. 

Most Read News

आंधळगाव येथील कजोळ छोटेलाल भुरे (४२) व त्याची पत्नी अनिता कजोळ भुरे (३५) यांच्या घरी चिकू आढळून आला. त्या दोघांनी गोंदियाच्या कुंभारेनगरातील मनीषा उर्फ मंगला संतोष चंद्रिकापुरे या महिलेला १ लाख २० हजार रुपये घेऊन तिच्याकडून खरेदी केल्याचे समजले. या प्रकरणी गोंदिया पोलिसांनी कलम ३७०, सहकलम बालहक्क व संरक्षण अधिनियम कलम ७५, ८०, ८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कजोळ छोटीलाल भुरे (४२) व अनिता कजोळ भुरे (३५) दोन्ही रा. आंधळगाव, ता. मोहाडी, जि. भंडारा), मंगला उर्फ मनीषा संतोष चंद्रिकापुरे (३५, रा. कुंभारेनगर, गोंदिया), सुखदेव केशोराव डोये (५४, रा. सकरला आंधळगाव), अनिता अरविंद हटवार (३९, रा. चिचोली आंधळगाव) अशा पाच जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी आरोपी फरार असल्याचे समजले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या

गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×