गीता ही बोरकन्हार येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. गीताला आई-वडील व पाच बहिणी आहेत. सर्व बहिणींचे लग्न झाले आहे. त्यामुळे ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. कुटुंबात तीनच व्यक्ती, गरिबीची परिस्थिती असल्याने ती स्वत: इतरांकडे शेतीचे काम करून स्वत:च्या शिक्षणाचा खर्च करत होती. कॉलेजनंतर ती साखरीटोला येथील एका कापड दुकानात काम करत होती. मोकळ्या स्वभावाची व हसतमुख असलेल्या गीताने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे कळू शकले नाही. मात्र, ज्या दिवशी गीताने कीटकनाशक प्राशन केले. त्या दिवशी दुपारी २ वाजताच्या दरम्यान तिच्या मैत्रिणीचा फोन आला होता, असे घरच्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आता त्या दिशेने तपास सुरू केला आहे.