'
30 seconds remaining
Skip Ad >

Female Doctor Commits Suicide in Gondia | गोंदिया : महिला डॉक्टरने गळफास घेऊन केली आत्महत्या - Batmi Express

0
Gondia,Gondia Suicide, Suicide,suicide news,Gondia Crime,gondia news,Gondia Marathi News,Gondia Live News,
महिला डॉक्टरने गळफास घेऊन केली आत्महत्या

गोंदिया  ( Female Doctor Commits Suicide in Gondia ) : तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शुक्रवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. डॉ.नेहा हेमराज पारधी (वय ३०) ( Dr. Neha Hemraj Pardhi  )  मृत डॉक्टर महिलेचे नाव आहे.

डॉ. नेहा पारधी (  Dr. Neha Pardhi ) या तिरोडा येथील शहीद मिश्रा वॉर्ड येथे भाड्याच्या खोलीत राहात होत्या. त्या दंत रोग तज्ज्ञ ( Dental specialist )  असून त्यांचे तिरोडा येथे क्लिनिक होते. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्या खोली बाहेर न पडल्यामुळे घरमालकाने त्यांच्या खोलीकडे पाहिले असता त्यांच्या खोलीचे दार आतून बंद होते. याची सूचना त्यांनी लगेच डॉक्टरच्या वडिलांना दिली. डॉक्टरच्या वडिलांनी खोलीवर येऊन पाहणी केली असता डॉ. नेहा पारधी (  Dr. Neha Pardhi ) यांनी आपल्या खोलीत गळफास घेतला होता. ( Female Doctor Commits Suicide in Gondia )

विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यांच्या आत्महत्येमागील कारण हे कळू शकले नाही. यासंदर्भात तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×