आज महिला दिनानिमित्त शहरातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी आयोजित केलेल्या महिला वाहन रॅलीला क्रांती चौकातून सुरुवात करण्यात आली. शहरात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनदेखील करण्यात आले असून आज जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी महिलांसाठी वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीसाठी क्रांती चौकात सकाळपासून महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नियोजनबद्ध पद्धतीने सदरील रॅलीचे आयोजन करण्यात आली. सदरील रॅली ही क्रांती चौक ते महावीर चौकापर्यंत काढण्यात आली. रॅलीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.